अ‍ॅमेझॉन पुन्हा अडचणीत! हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील अश्लील सेक्स स्टोरीजमुळे नवा वाद

नवी दिल्ली – देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा तापलेला असतानाच अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर धर्माच्या  आधारावर अश्लील साहित्य उपलब्ध झाले असल्याचे समोर येत आहे. अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर मुस्लीम पुरुष आणि हिंदू स्त्रियांमधील संबंधांवर अश्लील पद्धतीने भाष्य करणारी अनेक पुस्तके उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.

‘इंडियन हिंदू वाईफ्स अफेर विथ हर मुस्लीम लव्हर’ हे त्यातीलच एक पुस्तक आहे. हे पुस्तक किंडलच्या अनलिमिटेड स्बस्क्रीप्शनमध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकाची लेखिका निलिमा स्टीव्हन्स आहे. या पुस्तकाच्या कव्हरवर मुस्लीम पुरुष आणि टिकली लावलेली हिंदू महिला दाखवण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये लग्न झालेली हिंदू महिला श्वेता आणि तिची मुस्लीम मैत्रिण रझीया हिचा पती अशरफ यांच्यामधील लैंगिक संबंधांबद्दल अगदी अश्लील भाषेत वर्णन करण्यात आले आहे. याच लेखिकेची किंडलवर २० हून अधिक अशाच प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत.

असेच निलिमा स्टीव्हन्सचेच पुस्तक म्हणजे ‘इंडियन वाइफ चिटिंग : सेक्स विथ नेबर’,‘चिटिंग वाइफ्स अफेर विथ हसबण्ड्स फ्रेण्ड’ या पुस्तकामध्येही हिंदू महिला आणि मुस्लीम व्यक्तीमधील संबंधांचे अगदी अश्लील वर्णन करण्यात आले आहेत.

सुनिता सारन या लेखिकेचीही अनेक पुस्तके अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर उपलब्ध आहेत. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक दाढी असणारा पुरुष आणि दोन महिला दिसत आहेत. एका महिलेने साडी नेसलेली असून दुसरी अंगावर चादर ओढून बसलेली दिसत आहे. हा डॉन या महिलांना धमकावून त्यांच्यावर बलात्कार करतो आणि त्याचे व्हिडीओ बनवून दाखवण्याची धमकी देतो अशी कथा या पुस्तकात आहे. या महिलांना डॉनची भिती वाटत असली तरी त्यांना यामध्ये सुख मिळत असते, असेही वर्णन या पुस्तकात आहे.

अशाप्रकारे प्रविश सिंग नावाच्या लेखकाचे ‘हिंदू वाईफ सेक्सी एन्काऊन्टर विथ मुस्लीम ड्रायव्हर’ या नावानेही अ‍ॅमेझॉनच्या किंडल एडिशनवर पुस्तक उपलब्ध आहे. अशाप्रकारचे अ‍ॅमेझॉनवर हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंधांबद्दल बरेच अश्लील साहित्य उपलब्ध असल्याचे स्वराजमाग डॉट कॉमने म्हटले आहे.

अ‍ॅमेझॉन किंडलवर थेट पुस्तके प्रकाशित करण्याची सोय 

अ‍ॅमेझॉन किंडलवर थेट पुस्तके प्रकाशित करण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे एक अकाऊंट बनवल्यानंतर काही पैसे मोजून पुस्तक प्रकाशित करता येतात. अनेकदा नवीन लेखक खोट्या नावाने अकाऊंट सुरु करुन अशी पुस्तके प्रकाशित करतात. या सेवेमध्ये अ‍ॅमेझॉनने काही विशिष्ट घटकातील लोकांच्या भावना दुखावणारा मजकूर प्रकाशित करता येणार नाही, असे नियमांमध्ये म्हटले आहे. असे आढळल्यास वाचकांना त्यासंदर्भात रिपोर्टही करता येतो. तरीही ही पुस्तके उपलब्ध असून किंडलवर सर्च केल्यावर लगेच दिसून येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.