नवी दिल्ली – फ्युचर समूहाने मदतीसाठी अमेझॉन कंपनीकडे आठ वेळा विचारणा करूनही अमेझॉन कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे फ्युचर समूहाचे कामकाज चालू राहावे याकरिता रिलायन्स उद्योग समूहाची मदत घेतली असे फ्युचर समुहाचे संस्थापक किशोर बियाणी यांनी म्हटले आहे.
फ्युचर समुहाचा अमेझॉनशी यापूर्वी व्यवहार झाला होता. त्यानुसार अडचणीच्या काळात ऍमेझॉन फ्युचर समूहाला मदत करणे अपेक्षित होते. मात्र फ्युचर समूहाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रिलायन्स समूहाबरोबर फ्युचर समूहाचा व्यवहार झाला. त्यामुळे फ्युचर कंपनी कार्यरत राहू शकली. कर्मचाऱ्यांचे व भागधारकांचे हितसंबंध अबाधित राहू शकले असे बियाणी यांनी म्हटले आहे.
आता फ्युचर समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजदरम्यानच्या व्यवहाराला ऍमेझॉन कंपनीने कायदेशीर आव्हान दिले आहे. हे प्रकरण सध्या विविध न्यायालयात चालू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर कशामुळे व्यवहार केला जात आहे, यासंदर्भात आम्ही वेळोवेळी ऍमेझॉन कंपनीला माहिती देत होतो. मात्र ऍमेझॉन कंपनीने त्यावेळी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही असे बियाणी म्हणाले.