श्रीनगर – जम्मू कश्मीरच्या अनंतनाग महामार्गाजवळ आयईडी सापडल्याच्या सूचना मिळाल्याने अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. सुरक्षा दलांना मीर बाजार येथे आयईडी असल्याचा संशय असून तिथे शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
सोमवारी जवळपास तीन हजारांहून अधिक भाविकांचा एक जथ्था यात्रेसाठी रवाना झाला आहे.
मंगळवारी आयईडी असल्याची माहिती मिळताच सुरक्षादलांनी श्वानपथकासह संशयित जागी शोधमोहीम सुरू केली आहे. यात्रेच्या मार्गावर चौकशी केली जात आहे. या तपासणीचा भाविकांना त्रास होत असला तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा दल कोणतीही जोखीम उचलणार नाहीत.