जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातली श्री अमरनाथ यात्रा यंदा २८ जुनपासून सुरु होईल. ही यात्रा ५६ दिवस चालेल आणि २२ ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करावी लागली होती.
यात्रेदरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल, असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अमरनाथ गुहेत सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या पुजेचं, तसंच इतर पारंपरिक विधींचं ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.