अमरसिंह यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली – राज्यसभेचे सदस्य व समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांच्यावर दिल्लीत छत्तरपूर स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व अन्य काही नातेवाईक उपस्थित होते. त्यांचे सिंगापूर येथे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या दोन्ही कन्यांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. 

करोनाच्या निर्बंधांमुळे अंत्यविधीला अत्यंत मोजक्‍याच लोकांना अनुमती देण्यात आली होती. माजी खासदार जयाप्रदा मात्र यावेळी उपस्थित होत्या. अमरसिंह आपले राजकारणातील गॉडफादर होते, असे त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना नमूद केले होते.

तत्पूर्वी अमरसिंह यांच्या छत्तरपूर येथील फार्म हाऊसवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदे, आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अमरसिंह यांच्या पत्नी पंकजासिंह आणि त्यांच्या दोन्ही कन्या यावेळी उपस्थित होत्या.

सिंगापूरहून त्यांचे पार्थिक विशेष विमानाने रविवारी रात्री दिल्लीत आणण्यात आले. 64 वर्षीय अमरसिंह यांना सहा महिन्यांपूर्वीच सिंगापूरला उपचारासाठी हलवण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.