नवी दिल्ली – राज्यसभा खासदार व समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंग ( Amar Singh passes away ) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. अमर सिंग यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून मूत्रपिंडाशी निगडित व्याधींमुळे सिंगापूर येथे उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
अमर सिंग ( Amar Singh passes away ) हे समाजवादी पक्षामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत होते. मात्र २०१७ मध्ये पक्षाची कमान अखिलेश यादव यांच्या हाती आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यापूर्वी २०१० मध्ये देखील पक्षाने त्यांना बडतर्फ केले होते परंतु काही वर्षांनंतर त्यांचे पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते.
अमर सिंग ( Amar Singh passes away ) यांच्या जाण्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी हालहाल व्यक्त केली असून सिंग यांचे पक्षांतर्गत सीमांपलीकडील मैत्रीसाठी कायम स्मरण केले जाईल असं म्हंटल आहे.