अमरसिंह यांची 12 कोटीची मालमत्ता आरएसएसला दान

आजमगढ (उत्तर प्रदेश) – राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी आपली वडिलार्जित मालमत्ता दान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तरवा येथील सुमारे 12 कोटी रुपये किमतीची जमीन आणि आणि घर ते आरएसएसची सहयोगी संस्था राष्ट्रीय सेवा भारतीला देणार असल्याची माहिती अमरसिंह यांचे निकटवर्ती वीरभद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

सुरुवातीला ही मालमत्ता राष्ट्रीय सेवा भारतीला कराराने देण्याचा विचार होता, मात्र अमरसिंह यांनी तो बदलून मालमत्ता दान करून टाकली आहे. 20 फेब्रुवारी रोजी लालगंज तहसीलच्या उप निबंधन कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करण्यात येणार आहे. या प्रसंगी राष्ट्र सेवा भारतीचे राष्ट्रीय संगठन मंत्री ऋषिपाल सिंह ददवाल उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते तरवा येथील आपल्या मालमत्तेला भेट देण्याची शक्‍यता आहे.

या जागेत अमरसिंह यांचे वडील स्व. हरिश्‍चंद्र सिंह यांच्या नावाने ठाकूर हरिश्‍चंद्र सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार असून त्याद्वारे शिक्षण संस्था आणि सामाजिक कार्य चालवण्यात येणार आहेत. 23 फेब्रुवारी रोजी कानपूरमध्ये होणाऱ्या आरएसएसच्या एका मुख्य कार्यक्रमात अमरसिंह मुख्य अतिथी आणि उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा विशेष अतिथी असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.