मी पूर्णपणे निःस्वार्थी नाही …….

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचे चाहते कोटींच्या घरात आहेत. गेली कित्येक वर्षे त्याने अक्षरशः बॉलीवूडवर राज्य केले आहे. परंतु  त्याला वाटते की राजकारण त्याच्यासाठी नाही. कारण तो पूर्णपणे निःस्वार्थी नाही. दक्षिणेतील जे मोठे कलाकार राजकारणात उतरले आहेत त्यांच्यामध्ये राजकारणातील गुण नैसर्गीकरित्या आहेत.

माझ्या कामाच्या स्वरूपातून मला देशासाठी जे करता येईल ते मी  करण्यास कधीही तयार आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे की राजकारण हे वेगेळेक्षेत्र आहे आणि मला त्यातले जास्त ज्ञान नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुम्हाला त्या क्षेत्रात विशेषतज्ञ असावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही पूर्णपणे निःस्वार्थी आणि कामाप्रती पूर्णपणे झोकून दिलेले हवेत. मला निश्चित माहिती नाही की मी निःस्वार्थी आहे की नाही. त्यामुळे मला राजकारण येण्याबाबत शंका आहे.

दक्षिणेतील कलाकार मंडळी ही राजकारणात आहेत करत ते त्यांच्यात नैसर्गीक येते. “रजनी सर आणि कमल हसन सर यांना मी चांगले ओळखतो. ते राजकारणात उतरण्याच्या अगोदरपासून सामाजीक जीवनात लोकांना मदत करत होते.

सध्या शाहरुख त्याच्या आगामी ‘झिरो’ या चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीचे काम चालू आहे. हा चित्रपट डिसेंबर मध्ये प्रदर्शित होणार आहे. यात कतरिना कैफ, अनुष्का शर्मा देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)