राफेल व्यवहाराच्यावेळी मी सत्तेत नव्हतो- फ्रान्सचे राष्ट्रपती

राफेल विमान व्यवहाराचा मुद्दा उचलून भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदी यांना सतत लक्ष्य केले जात आहे. काँग्रेसने उचलून धरलेल्या या मुद्याची व्यापकता खूप वाढली असून यामध्ये आंतरराष्ट्रीय नेते देखील ओढले जात आहेत. न्यूयॉर्कमध्ये सध्या संयुक्त राष्ट्र परिषद चालू आहे. त्यामध्ये फ्रान्सचे सध्याचे राष्ट्रपती इमैनुअल मैक्रों यांना पत्रकार परिषदेत राफेल व्यवहारा संबंधी प्रश्न विचारण्यात आले. त्याप्रश्नांची सरळ उत्तरे न देता त्यांनी वेळ मारून नेली.

फ्रान्सचे सध्याचे राष्ट्रपती इमैनुअल मैक्रों हे पत्रकार परिषदेत बोलत होते तेव्हा त्यांना एका भारतीय  वृत्त वाहिनीच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की, जसे फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांच्यानुसार भारत सरकारकडून राफेलच्या कंत्राटासाठी रिलायन्स डिफेन्सचे नाव सुचवण्यात आले होते, त्यात किती तथ्य आहे? या प्रश्नावर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी याचे खंडण केले नाही आणि आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,” त्यावेळी मी सत्तेमध्ये नव्हतो. परंतु मला माहिती आहे की,अश्या स्वरूपाच्या व्यवहारासाठी आमचे नियम ठरलेले आहेत. हे एका सरकारची दुसऱ्या सरकारशी चर्चा आहे आणि हे व्यापारी संबंध खूप व्यापक स्वरूपाचे आहेत. जे भारत आणि फ्रान्सच्यामध्ये सैन्य आणि सुरक्षेची आघाडी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे राफेल प्रकरण ?
भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ लढाऊ विमानाच्या खरेदीचा व्यवहार झाला होता.  या व्यवहारामध्ये लाखो डॉलरचा घोटाळा झाला आहे असा काँग्रेसचा दावा आहे. त्याचबरोबर हे कंत्राट अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सला स्वताचे हीत साधून मोदींनी मिळवून दिल्याचेही काँग्रेसी नेत्यांकडून वारंवार बोलले जात आहे.

ज्यावेळी राफेल करारावर स्वाक्षरी झाली त्यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद होते. फ्रान्सचे सध्याचे राष्ट्रपती इमैनुअल मैक्रों यांनी मागीलवर्षी मे मध्ये पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)