#T20WorldCup Final : एलिसाचे अर्धशतक; दहा षटकांत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद नव्वदी पार

मेलबर्न – जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे होत असलेल्या आयसीसी टी-20 महिला विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा वेळच विजेता ऑस्ट्रेलिया बाजी मारणार की, (वर्ष 1983 प्रमाणे) प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेला भारत आश्‍चर्यकारक कामगिरी करणार, याकडे संपूर्ण क्रीडा विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया या सामन्यास मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरूवात झाली असून ऑस्ट्रेलियाच्या संघाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने तडाखेबाज फंलदाजीस सुरूवात केली असून एलिसा हीलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या 10 षटकांत बिनबाद 91 धावा केल्या आहेत. 10 षटक पार पडले तेव्हा सलामीवीर एलिसा हीली नाबाद 57(33) आणि बेथ मूनी नाबाद 31(27) धावांवर खेळत होत्या.

भारतीय संघाकडून गोलंदाजीत दिप्ती शर्माने 2 षटकांत 23, शिखा पांडेने 2 षटकातं 19, राजेश्वरी गायकवाडने 3 षटकांत 23, पूनम यादवने 2 षटकांत 14 तर राधा यादवने 1 षटकांत 12 धावा दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.