भवानीनगर (पुणे) – प्रजा हीच राजा आम्ही फक्त सेवेकरी या तत्त्वावर आजपर्यंत जी जमेल तशी समाजाची सेवा करत आलो आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कायम आग्रही राहिलो आहे. तळागाळातील लहान मोठ्यांपासून ते सर्व स्तरातील प्रत्येक व्यक्तीशी आदराचे संबंध असल्याने येणार्या निवडणुकीत जनता मतदानाद्वारे मला साथ देईल, असे मत सणसर ग्रामपंचायतीचे वॉर्ड क्रमांक तीनचे अपक्ष उमेदवार अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर यांनी व्यक्त केले.
वडील विठ्ठलराव निंबाळकर यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा अनुभव मला कायम मिळत गेला. सणसर गावचे उपसरपंचपदही मला मिळाले. त्याकाळात सणसर गावामध्ये पहिली पाणीपुरवठा योजना अंमलात आणली.
त्याचप्रमाणे गावातील ओढ्याचे खोलीकरण, विठ्ठल नगर, इरिगेशन बंगला, भगत मळा या भागांत बंदिस्त गटार, अंतर्गत सिमेंट रस्ते, साईनगर येथे संरक्षण भिंत, श्रीसंत तुकाराम महाराज पालखी तळाच्या नियोजित कामाचा पाठपुरावा, भैरवनाथ मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुशोभीकरण, श्री छत्रपती हायस्कूलमधील बोलक्या भिंती व भिंतींना तसेच अंगणवाड्यांना रंगरंगोटी, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये बारा हायमास्ट दिवे, विठ्ठलनगर ते सणसर ओढा तेहतीस लाखांची गटार योजना पूर्ण. काही भागातील 70 वर्षांच्या रस्त्याचा प्रश्न यशस्वीरित्या मार्गी लावला. तरुणांसाठी भाग्यनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खवळे वस्ती याठिकाणी जीम उभारण्यात आली आहे.
सणसर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मी उभा असून पुढील काळात जनतेने साथ दिल्यास मी नियोजित विकास कामे करणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार, वाडी वस्त्यांवर राहिलेल्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्यात येतील, बंदिस्त गटर लाइन राहिलेले असेल ती पूर्ण केली जाईल, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, भविष्यात येणार्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून अजूनही नव्याने ओढा खोलीकरण करण्याचे काम करण्याचा मानस आहे.
या भागामध्ये नीरा-भीमा स्थिरीकरणामुळे शेतकर्यांना जो त्रास होत आहे त्याबाबत शेतकर्यांच्या बाजूने कायम लढणार आहे. सणसर गावासाठी अद्ययावत शौचालय, बसस्थानक नव्याने बनविण्याचा मानस अभयसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
आयकार्ड फोटो : अभयसिंह निंबाळकर