पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.21) मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांसाठी 246 उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीसाठी 77 लाख, 29 हजार, 217 इतके मतदार 7 हजार 915 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान प्रकियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक तो बंदोबस्त तैनात केला आहे.
ग्राह्य धरण्यात येणारी ओळखपत्रे
1) पासपोर्ट, 2) ड्रायव्हिंग लायसन्स, 3) राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्रातील, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र, 4) बॅंक व पोस्ट कार्यालयाने फोटोसह दिलेले पासबुक, 5) पॅन कार्ड, 6) आधार कार्ड, 7) राष्ट्रीय जनसंख्या रजिस्ट्रारने दिलेले स्मार्ट कार्ड, 8) मनरेगा जॉब कार्ड, 9) श्रम मंत्रालयाच्या योजनेद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 10) पेन्शन ओळखपत्र 11) खासदार, आमदार यांनी दिलेले ओळखपत्र.
ठळक वैशिष्टे
एकूण मतदार- 77 लाख 29 हजार 217
एकूण मतदान केंद्र – 7 हजार 915
संवेदनशील मतदान केंद्र – 252
एकूण कर्मचारी – 45 हजार