गणेश चतुर्थीला देशभरात गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यंदा करोनाचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सवावर काही नियम लागू करण्यात आले आहेत. या सावटातही बॉलीवूड सेलिब्रिटीजनी गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी केली. याप्रसंगी अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. अभिनेता संजय दत्तच्या घरीही गणपतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
संजय दत्तने सोशल मीडियावर गणेश आगमनाचा एक फोटो शेअर केला आहे. यात तो आणि त्याची पत्नी मान्यता हे घरातील गणपतीच्या डेकोरेशनसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत संजय दत्तने लिहिले की, यंदा नेहमीप्रमाणे गणरायांचे स्वागत मोठया धुमधडाक्यात साजरी करता आले नसले तरी बाप्पांबद्दलची आस्था तिच आहे.
View this post on Instagram
I miss them so much❤️ To everyone who is with their families right now, cherish them!
मी प्रार्थना करतो की, या शुभ पर्वात आपल्या सर्वांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळो आणि सर्वांना चांगले आरोग्य व आनंद लाभो. गणपती बाप्पा मोरया! वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संजय दत्तचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.
यात सडक-2, शमशेरा, भुज, केजीए-2, पृथ्वीराजफ आणि तोरबाज आदी चित्रपट आहेत. संजय दत्त अखेरच्या वेळी आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत चित्रपटात झळकला होता.