पुरंदर विमानतळासाठी पर्यायी जागा?

दिल्ली येथे बैठक : लगतच्या जागांची पुन्हा तपासणी

पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदर तालुक्यात होणार आहे, मात्र विमानतळाच्या जागेवर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. दरम्यान विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेसह याच तालुक्यातील लगतच्या पर्यायी जागांच्या तपासणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.

 

 

पुरंदर विमानतळ उभारण्यासाठी सात गावांमधील सुमारे 2,832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. तसेच या विमानतळासाठी केंद्र सरकारकडून तसेच संरक्षण विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळालेल्या आहेत. भूसंपादनाबाबतचे पर्यायदेखील निश्चित करण्यात आले असून, अद्याप ते जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु या जागेस काहींनी आक्षेप घेतला. विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेपासून दहा किलोमीटर अंतरावर जागेचा विचार करावा, त्या दृष्टीने यावर निर्णय सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मध्यंतरी मुंबई येथे बैठक झाली होती. त्या बैठकीत विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेचे भूसंपादन सुरू करण्यापूर्वी अन्य पर्याय जागेची पुन्हा एकदा हवाई दल आणि एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून तपासणी करून घ्यावी.

 

 

त्याबाबतचा अहवाल तीन आठवड्यांत सादर करावा, असा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, विधान परिषद निवडणुकांनंतर आता या कामांना गती मिळाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.