अल्लू सिरीशने केली आगामी चित्रपटाची घोषणा

एबीसीडीनंतर दोन वर्षांनंतर अभिनेता अल्लू सिरीशने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे प्री-लूक पोस्टरने प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. काही वेळातच चाहत्यांद्वारे ञ्चडळीळीह6 ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या प्री-लूकमध्ये एका गहन दृश्‍यात एक युगुल दिसत आहे. 

सोबतच या पोस्टरवर कलाकारांची नावे झळकली आहेत. या चित्रपटात अल्लू सिरीशसह अनु इमैनुएल असून “विजेता’ फेम राकेश ससी हे दिग्दर्शन करणार आहेत. जीए2 पिक्‍चर्सद्वारा निर्मित या चित्रपटाला अल्लू अरविंद यांनी प्रस्तुत केले आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अल्लू सिरीश नुकताच एका हिंदी सिंगल व्हिडिओ “विलायती शराब’मध्ये झळकला होत. या व्हिडिओने 100 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला. चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ते अजूनही आपली जागा कायम ठेवून आहे.

एबीसीडीशिवाय अल्लू सिरीशचा आणखी एक चित्रपट ओक्‍का क्षनम हिंदीत “शूरवीर’ या नावाने डब करण्यात आला आहे. तेलुगु आणि मल्याळम चित्रपटातील अल्लू सिरीशची कामगिरी चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या प्री-लूक पोस्टरने तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.