Allu Arjun । ‘पुष्पा: द रुल’ हा अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ चा सिक्वल आहे, हा 2024 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसू शकतो. रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
View this post on Instagram
याचा पहिला भाग 15 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण आता या सिनेमाची रिलीज डेट वाढवण्यात आल्याच्या अफवा आहे. म्हणजेच, अफवांनुसार, हा चित्रपट त्याच्या नियोजित रिलीज तारखेला थिएटरमध्ये येणार नाही. या बातमीनंतर चाहते खूपच निराश झाले आहेत.मात्र, ‘पुष्पा: द रुल’च्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
काही दिवसांपूर्वी, या चित्रपटाचे ‘कपल सॉन्ग’ रिलीज करण्यात आले होते. मेरा सामी हे गाणे प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीत येत असून हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना यात श्रीवल्लीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पुष्पा 2 च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता.