मुंबई – अल्लू अर्जुन फक्त साऊथच नाही तर देशभरात आपल्या हटके अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. पुष्पा या आपल्या दमदार चित्रपटानंतर अल्लू अर्जुनची विदेशातही फॅन फॉलोविंग वाढल्याचे पाहायला मिळते. सध्या तो त्याच्या न्यूयॉर्क टूरमुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनचे विदेशातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तो अमेरिकेच्या रस्त्यांवर तिरंगा फडकवताना दिसत आहे.
अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा यांनी आयोजित केलेला सर्वात लोकप्रिय वार्षिक कार्यक्रम आहे याला हजेरी लावत अल्लू अर्जुनने भारताचे प्रतिनिधित्व केले. अल्लूने मार्शल ऑफ इंडिया परेड डेचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो तिरंगा फडकवताना दिसत आहे यावेळी बॅग्राऊंडला लावलेले वंदे मातरम स्पष्टपणे ऐकू येत आहे.
अल्लू अर्जुन 21 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर तिरंगा फडकवताना दिसला आणि त्याने भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली. यावेळी रस्त्यावरच त्याने सर्वांचे आभार मानले.विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आयकॉन स्टारचे यावेळी जोरदार स्वागत केले. यावेळी रस्त्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अल्लूने थेट अमेरिकेत तिरंगा फडकवल्याबद्दल अभिनेत्याचे चाहते खूप आनंदी आहेत आणि त्याचे जोरदार कौतुक करत आहेत.
Dream for many actors
INDIAS PRIDE ALLUARJUN#GrandMarshalAlluArjunAtNYC #PushpaTheRule #AlluArjun𓃵 pic.twitter.com/wk3VrwdSVL
— ViswAA (@viswanadh_143) August 21, 2022
तिरंगा फडकवल्यानंतर अल्लू अर्जुनने आणखी काही नवीन फोटो शेअर केली आहेत ज्यात तो न्यूयॉर्क शहराच्या बड्या हस्तींसोबत दिसत आहे. फोटोत तो पुष्पाच्या आयकॉनिक पोझ मारताना देखील दिसत आहे.यावेळी त्याने दिग्ग्जजांचे आभार देखील मानले आहेत.