bollywood news । सध्या अल्लू अर्जुनचे संपूर्ण लक्ष पुष्पा 2 चित्रपटवर आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. नुकतेच निर्मात्यांनी क्लायमॅक्स शूट होत असल्याची माहिती दिली होती. चित्रपट वेळेवर चित्रपटगृहात दाखल होईल. सुरुवातीला हा पिक्चर १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण काम पूर्ण न झाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तयारी जोरात सुरू आहे.
या चित्रपटाशिवाय अल्लू अर्जुनचे नाव आणखी दोन प्रोजेक्टशी जोडले गेले आहे. पहिला- संदीप रेड्डी वंगा आणि दुसरा- ऍटलीचा चित्रपट आहे. पुष्पा 2 नंतर अल्लू अर्जुन कोणत्या चित्रपटात काम करणार आहे याचे एक मोठे अपडेट समोर आले आहे.
रिपोर्टनुसार अल्लू अर्जुन जान्हवी कपूरसोबत त्याचा पुढचा चित्रपट करू शकतो हे समोर आले आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूड सोबतच तिच्याकडे दक्षिणेतही अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहे. सध्या ती देवरा चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरने या चित्रपटाचे काम पूर्ण केले आहे.
यानंतर ती राम चरणच्या RC16 या चित्रपटात काम करणार आहे. आता लवकरच ती अल्लू अर्जुनसोबत एका चित्रपटात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. अल्लू अर्जुनसोबत जान्हवी कपूरच्या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे झाले तर जान्हवी कपूरच्या करिअरसाठी ही मोठी संधी असेल.
दरम्यान, अल्लू अर्जुन त्याच्या अचूक कास्टिंगसाठी ओळखला जातो. श्रीनिवाससोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी दिग्दर्शक त्रिविक्रम एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. त्याचे शूटिंग 2025 च्या सुरुवातीला सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. अल्लू अर्जुन आणि जान्हवीची ऑन स्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहे.