अल्लू म्हणाला, ‘अभिनेता बनण्यापूर्वी…’

बॉलीवूडच्या किंवा मनोरंजनाच्या-कलेच्या क्षेत्रात येताना प्रत्येक जण कितीही महत्त्वाकांक्षेने आलेला असला तरी यातील प्रत्येकाचा “प्लॅन बी’ तयार असतो. म्हणजे जर इथं यश मिळाले नाही, आपल्याला जमलं नाही किंवा प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही तर काय करायचं याचा विचार प्रत्येकाने केलेला असतो वा करत असतो.

 

View this post on Instagram

 

Samajavaragamana on the way #Samajavaragama #AlaVaikunthapurramloo

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on


कित्येकांच्या अंगी अन्यही काही गुण असतात; पण अंतर्मनातील पॅशन आणि बरेचदा स्टारडम, ग्लॅमरची ओढ नकळतपणानं या चंदेरी दुनियेकडे खेचून आणते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांत स्टायलिश ऍक्‍टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनलाही अलीकडेच याबाबत विचारणा करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

Wishing you all a very HappyDussehra #happydussehra #AlaVaikunthapurramuloo

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on


याचे कारण अल्लूच्या अंगी अनेक कलागुण आहेत. अभिनयाखेरीज तो एक चांगला आर्टिस्टही आहे. त्याच्या आयुष्यात एक टप्पा असाही होता की या कलेमध्येच प्रोफेशनल व्हायचे. एका लोकप्रिय कार्यक्रमामध्ये अल्लूला हा प्रश्‍न विचारला गेला की, अभिनेता बनण्यापूर्वी तू आपल्या आयुष्यात काय करू इच्छित होतास? यावर अल्लू म्हणाला की, मला पियानो आणि मार्शल आर्टस्‌चा शिक्षक बनायचे होते.


इतकेच नव्हे तर कधी मला नासामध्ये जाऊन काम करावे असेही वाटायचे. काही वेळा तर ऍनिमेटर आणि व्हिज्युअल इफेक्‍टस्‌ सुपरवायजर बनण्याचाही मी विचार करायचो. पण या क्षेत्रात आलो, स्थिरावलो आणि आता रमलोही, असे अल्लू सांगतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.