पुणे – कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंगबरोबर पारंपारिक पध्दतीने दावे दाखल करण्यास मुभा देण्यात आली आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत ही मुभा देण्यात आलेली आहे. याबाबतचे निवेदन दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांनी कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीशांना दिले होते. त्यानुसार ही मुभा मिळाली आहे.
कौटुंबिक न्यायालयात सर्व दावे ई-फायलिंगद्वारे दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र, वकील वर्गातील अनेकांना अद्याप ई-फायलिंग पध्दतीने दावे दाखल करण्याचे माहिती नाही. याबाबत शिकण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे ई-फायलिंगसोबत पारंपारिक पध्दतीने दावे दाखल करण्यास मुभा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसर ही मुभा देण्यात आली आहे.