बामणोली भागातील विकासकामांसाठी पावणेदोन कोटी मंजूर : शिवेंद्रसिंहराजे

कोयना प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतून मिळाला निधी

सातारा – सातारा-जावली मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांचा धडाका सुरु ठेवला असून धोम डावा कालवा क्रमांक 2 साताराचे कार्यकारी अभियंता व मंत्रालय स्तरावर वारंवार पाठपुरावा करून बामणोली भागातील कोयना प्रकल्प बाधित गावांमधील विकासकामांसाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी 1 कोटी 80 लाख 95 हजारांचा निधी मंजूर करून आणला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पांतर्गत जावली तालुक्‍यातील पुनर्वसित गावामध्ये नागरी सुविधा देण्यासाठी रु. 1 कोटी 80 लाख 95 हजार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यामध्ये बामणोली भागातील शेंबडी खुर्द या ठिकाणी पर्यायी पोहोच रस्ता (8 किमी) तयार करण्यासाठी 10 लाख 13 हजार रुपये, वाकी येथे लॉंच धक्का पोहोच रस्ता डांबरीकरण करणे 2 लाख 53 हजार, केळघर तर्फ सोळशी नळ पाणीपुरवठा योजनेकरता पोहोच रस्ता डांबरीकरण करणे 18 लाख 05 हजार, तेटली येथे लॉंच धक्का पोहोच रस्ता डांबरीकरण करणे 9 लाख 61 हजार, केळघर तर्फ सोळशी लॉंच धक्का पोहोच रस्ता (1/050 ते 1/600) डांबरीकरण करणे 18 लाख 32 हजार, केळघर तर्फ सोळशी लॉंच धक्का पोहोच रस्ता (0/500 ते 1/050) डांबरीकरण करणे 18 लाख 09 हजार, आपटी लॉंच धक्का पोहोच रस्ता (0/500 ते 0/750) डांबरीकरण करणे 8 लाख 35 हजार, आपटी (शिवाजीवाडी) पोहोच रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 9 लाख 17 हजार, आपटी (कदम वस्ती) पोहोच रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 9 लाख 51 हजार, आपटी (सोमजाईवाडी) पोहोच रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 8 लाख 27 हजार, आपटी (विठ्ठल वाडी) पोहोच रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 10 लाख 63 हजार, निपाणी (तोरणे वस्ती) पोहोच रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 6 लाख 72 हजार, केळघर तर्फ सोळशी लॉंच धक्का पोहोच रस्ता (1/600 ते 2/150) डांबरीकरण करणे 18 लाख 61 हजार, आपटी लॉंच धक्का पोहोच रस्ता (0/00 ते 0/500) डांबरीकरण करणे 17 लाख 26 हजार, तेटली (शिवाजीवाडी) लॉंच धक्का पोहोच रस्ता डांबरीकरण करणे 8 लाख 19 हजार, आपटी लॉंच धक्का पोहोच रस्ता (0/750 ते 1/125) डांबरीकरण करणे 7 लाख 51 हजार असा एकूण 1 कोटी 80 लाख 95 हजाराचा निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे बामणोली भागात हे मतांचे राजकारण न करता विकासाचे राजकारण हे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेकडून सुरू असलेले यातून पाहवयास मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here