हडपसर : वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न बाळगता रात्रंदिवस जनतेची अहोरात्र सेवा करणारे आपले पोलिस बांधव, डॉक्टर, नर्सेस, फायर ब्रिगेडचे जवान, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी यांना हडपसर येथील नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या माध्यमातून व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
तसेच नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या निधीतून प्रभाग क्र २६ मध्ये घनकचरासाठी घंटा गाडीचे लोकार्पणही यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाना भानगिरे यांनी चौका -चौकात उभारलेल्या सॅनिटायजर फवारणी रूम ची पाहणी करून नाना तू देवदूता सारखा नागरिकांसाठी धावत आहे, असे गौरवोद्गार आढळराव पाटील यांनी काढले .या प्रसंगी नानांनी नागरिकांना सोशल डिस्टेनिंग चे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच अति महत्वाचे काम असेन तरच बाहेर एकानेच पडावे व जास्तीत जास्त घरातच बसण्याचा नागरिकांना सल्ला दिला तसेच पोलिस बांधवाना डॉक्टर तसेच पत्रकार पुणे महानगरपालिका चे कर्मचारी, मेडिकल स्टोअ, यांचे विशेष कौतुक केले. यांना सर्वांना सहकार्य करावे अशी नागरिकांना विनंती केली.
मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश वाघ तसेच त्यांची डॉक्टर मित्र परिवार ,पुणे महानगरपालिका चे कर्मचारी अधिकारी, फायर ब्रिगेड चे अधिकारी पोलीस कर्मचारी, ऑफिसर सुहास यादव, नगरसेविका प्राची आल्हाट,अभिमन्यू भानगिरे,गणेश वाडकर ,योगेंद्र गायकवाड, योगेश सातव ,विकास शेवाळे, तुषार पवार ,नाना भानगिरे आयोजक टीम उपस्थित होते.