सातारा : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परिवहन विभागामार्फत सातारा जिल्ह्याकरता दोन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. या रुग्णवाहिकांचे वाटप क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय काशीळ व उपजिल्हा रुग्णालय फलटण यांच्याकरिता करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल देव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. के. पाटील, सेवा अभियंता गणेश घंगाळे, सामाजिक अधीक्षक व्यंकटेश गौर, सहाय्यक अधीक्षक शुक्ला व जोशी तसेच कार्यदेशक अपूर्वा गायकवाड, लावंड, प्रवीण जाधव, रणजीत मुसळे आदी प्रमुख उपस्थित होते.