जम्मू-काश्मीर मधील भाजपासोबतची युती विषाच्या प्याल्याप्रमाणे होती: मेहबूबा मुफ्ती 

श्रीनगर: भाजपाने जम्मू-काश्मीर मधील पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षासोबतची युती तोडल्यानंतर प्रथमच पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. “जम्मू आणि काश्मीर मधील भाजपा सोबतची युती विषाच्या प्याल्याप्रमाणे होती.” असे वक्तव्य मुफ्ती यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये केले आहे.
“मी सुरुवातीपासूनच ‘या’ युतीच्या विरोधात होते, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व दिवंगत वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांना देखील आपण युतीसंदर्भातील आपला विरोध बोलून दाखवला होता मात्र त्यांनी काश्मिरी लोकांच्या भल्यासाठी युती स्थापनेचा निर्णय घेतला होता” असे देखील त्या म्हणाल्या.
भाजपा सोबत युतीबाबत पुढे बोलताना “भाजपा-पीडीपीच्या युतीच्या काळामध्ये पीडीपीच्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे भाजपाला ‘आर्टिकल ३७०’ला हात लावता आला नाही तसेच रमझान सीझ फायर हा देखील युतीच्या काळातील एक चांगला उपक्रम होता.” असे दावे मेहबुबा मुफ्ती यांनी केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)