बेल्हे (वार्ताहर) – आळेफाटा येथे चार दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. आळेफाटा व्यापारी असोसिएशन वडगाव आनंद ग्रामपंचायत, आळे ग्रामपंचायत, व्यापारी, ग्रामस्थ व आळेफाटा पोलीस स्टेशनच्या संयुक्ति चर्चेनुसार जुन्नर तालुक्यातील करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतल्यानंतर आळेफाट्याच्या आसपासच्या गावात करोना रुग्ण दिसून येत आहेत. त्यामुळे या विषाणूचा प्रभाव अधिक वाढू नये म्हणून रविवार दि. 31 ते बुधवार दि.3 जूनपर्यंत सर्वांनी स्वयंस्फूर्तीने पुढील चार दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन व्यापारी असोसिएशनने केले आहे.