खळबळजनक! महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल; एकाला अटक

लाहोर : एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आजपर्यंत  अनेकवेळा समोर आला आहे. मात्र एखाद्या महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले नसतील. परंतु, हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. पाकिस्तानमधील एका महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ज्या महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे  तिचे नाव सानिया आशिक असे आहे. सानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. पाकिस्तानमधील  एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सानिया आशिक पाकिस्तानच्या मुस्लीम लीग नवाजच्या सदस्य आहेत. त्या पंजाब प्रांतातील तक्षशिला येथील आमदार आहेत.

पाकिस्तानमध्ये नुकताच  एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका रुममध्ये शूट करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जात आहे. या महिला आमदाराच्या नावानेच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर सानिया यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.

सानिया यांनी यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी तपास यंत्रणांकडे टिकटॉक आणि अन्य सोशल नेटवर्किंग व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ संदर्भात एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सायबर विभागाकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान बुधवारी हा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीच्या विरोधात वेगवगेळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“त्याने माझे व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल करण्याबरोबरच सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. व्हिडीओत दिसणारी महिला माझ्यासारखी दिसते,” असा दावा सानिया यांनी एका ट्विटमधून यापूर्वीच स्पष्टीकरण देताना केलेला. “धमकावणारे शेकडो कॉल, टिकटॉकवरील अश्लील गाणी, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट आणि माझ्याशी संबंधित कोणतेही व्हिडीओ व्हायरल करुन माझी प्रतिमा खराब करण्याचं काम केलं जात आहे,” असा आरोप सानिया यांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.