कुस्तीच्या सर्व स्पर्धा आता एकाच रचनेत

बेर्न – कुस्तीची स्पर्धा राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची असो, त्या स्पर्धेचे एकाच पद्धतीने आयोजन केले जावे यासाठी कुस्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग महासंघाने प्रत्येकासाठी एक ऑनलाइन मार्गदर्शिका तयार केली आहे. त्या पद्धतीनेच प्रत्येक स्पर्धेचे आयोजन करण्याचा आग्रह धरला आहे. यासाठी महासंघाच्या क्रीडा विभागाने मेगाफोन लाइव्हशी करार केला असून, त्याच्या सहकार्याने हा ऑनलाईन व्यापक कार्यक्रम तयार केला आहे.

गेल्या अनेक वर्षांत आंतरराष्ट्रीय कुस्तीचे व्यावसायिकीकरण वाढले आहे आणि प्रेक्षकसंख्या देखील वाढली आहे. तसतसे भागधारक आणि आयोजकांनी खेळाच्या क्षेत्रासाठी सुसंगत आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांची विनंती केली आहे. यामध्ये खेळाचा प्रत्यक्ष भाग कसा असावा.

तांत्रिक प्रतिनिधीसाठी टेबल आणि कोचिंग स्टाफने वापरलेले बॉक्‍स कसे असावेत याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघ आणि कुस्ती आयोजकांना हा कार्यक्रम देताना आम्हाला अभिमान वाटतो. अशा माहितीमुळे प्रत्येक स्पर्धेची तयारी सुरळीतपणे हाताळली जाईल आणि आमच्या गरजांचा आदर करणे सोपे जाईल. तसेच सर्व देशात एकाच पद्धतीने स्पर्धा आयोजित केल्या जातील, असे महासंघाचे क्रीडा संचालक जीन-डॅनियल रे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.