नगर – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागापूर परिसरात फवारणीचे काम सुरु असतांना कर्मचाऱ्यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांकडून दोघांना 8 ते 10 जणांकडून जबर मारहाण करण्याऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मात्र त्यातील पाच आरोपी अद्यापही मोकाट असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
प्रथमेश पाटोळे, गौरव भाकरे, अतुल भाकरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्याना नागापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत माहिती अशी की,महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ आणि अविनाश हंस या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली करण्यात आली होती. याबाबत नगरेवीकेचा दीर आरोपी निलेश भाकरे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर यांच्याकडे तपास देण्यात आला होता. तपासाचे चक्र फिरवत सुपनर यांनी तीन आरोपींना जेरबंद केले असून त्यातील आणखी पाच आरोपींचा शोध घेत आहे.