पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटातील बडे नेते शिवसेनेच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणूक तोंडावर आली असताना माजी आमदार आणि पदाधिकारी हे ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडतील या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पुण्यात ऑपरेशन टायगर काही नाही, सगळे टायगर आमच्याकडेच आहेत. गेले ते कुत्रे-मांजर होते’, असं विधान केले आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
पुण्यात मिशन टायगर काही नाही. सगळे टायगर आमच्याकडेच आहेत. पक्ष सोडून गेले ते कुत्रे मांजर होते. महापालिकेत नेमकं कामकाजाची पद्धत काय असते कधी कार्यकर्त्याने कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलावं या सगळ्या संदर्भातली तयारी आमची सुरू आहे . विधानसभानिहाय आणि बैठका बोलावलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे
पुढे म्हणाले, ‘महापालिका, नगरपालिका निवडणूका एप्रिल किंवा मे महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आम्ही निवडणूका निहाय बैठका बोलावल्या आहेत. गेल्या वेळेस आमचे १३८ उमेदवार लढले होते. त्याच जागांवरच्या तयारीचा आढावा आज आणि उद्या घेणार आहोत.
महापालिकेत कामकाजाची पद्धत काय असते, कार्यकर्त्याने कधी कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलावे या सगळ्या संदर्भातील आमची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडी होईल की नाही हा वरिष्ठाचा निर्णय आहे. जर आघाडी झाली तरी आम्ही आमच्या तयारीने ५० टक्के जागा मागू अन्यथा आमच्या स्वबळाच्या जागा लढवण्यासाठी तयार राहू’, असंही वसंत मोरे यावेळी म्हणाले.