देशातील सर्व माध्यमे विकली गेलीत – आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर – देशातील सर्व माध्यमे विकली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्‌स विकत घेतली आहेत. त्यामुळे जनतेसमोर सत्य परिस्थिती येणारच नाही. जे येईल ते खोटेच येईल, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी पंढरपूर तालुक्‍यातील कासेगाव येथे सभा घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रणिती यांनी राजकीय पीछेहाट होण्याचे खापरच माध्यमांवर फोडले. सर्व मीडिया मोदी यांनी विकत घेतली असेल तर 18 ते 20 वर्षाचा युवक कोणाला मतदान करणार हे कसे ठरवणार, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना अंगावर घेतले.

दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात खासदार शरद बनसोडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव केल्याने अडचणीत आल्या होत्या. आता पुन्हा आमदार प्रणिती यांनी थेट माध्यमांनाच विकाऊ म्हणत लक्ष केल्याने नवीन वादंग निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)