आगामी सर्व निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार – मायावती

लखनऊ – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच महागठबंधन संपुष्टात येण्यास समाजवादी पक्षाला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान, आगामी सर्व लहान-मोठ्या निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार असल्याचे मायावतींनी ट्विटरवर स्पष्ट केले.

मायावती म्हणाल्या कि, सपासोबतचे जुने मतभेद विसरून, २०१२-१७ या कालावधीत सत्तेत असलेल्या सपानं घेतलेले दलितविरोधी निर्णय बाजूला ठेवून आम्ही देशहितासाठी त्यांच्यासोबत आघाडी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडी धर्माचं निष्ठेनं पालनदेखील केलं

लोकसभा निवडणुकीनंतर सपाची वर्तवणूक बसपाला विचार करायला भाग पाडते कि, महागठबंधनमध्ये  भाजपचा आगामी निवडणुकांमध्ये पराभव करणे शक्य आहे. का? परंतु, हे शक्य नसल्याने पक्ष आणि चळवळीच्या हितार्थ बसपा आगामी सर्व लहान-मोठ्या निवडणूक आता स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.