नाट्यगृहाच्या कामाची जबाबदारी सर्वच नगरसेवकांची

नगर -उपनगरातील नागरीकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा उपक्रम असलेल्या नाट्यगृहाचे काम बंद पडणार नाही, याची दक्षता परिसरातील सर्वच नगरसेवकांनी घेतली पाहिजे. त्यात येणाऱ्या अडचणी तातडीने कशा सोडविता येतील, यावर विचार केला पाहिजे, अशी भूमिका उपमहापौर मालन ढोणे यांनी व्यक्त केली.

सावेडी भागातील बंद पडलेल्या नाट्यगृहाची उपमहापौर ढोणे यांनी आज पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नगरसेवक महेंद्र गंधे, नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका सोनाबाई शिंदे, उदय कराळे, सतीष शिंदे, अर्जुन जाधव, अशोक रकटे, संजय ढोणे, अभिजित ढोणे, ठेकेदार रसिक कोठारी, शाखा अभियंता मनोज पारखे, मनोज जाधव आदी यावेळी उपस्थित होते. कामाचे ठेकेदार व प्रभारी शहर अभियंता यांनी कामाबाबतची उपमहापौर ढोणे यांना माहिती दिली. त्यावर चर्चा करून या सर्व अडचणीवर मार्ग काढावा, अशी सूचना उपमहापौर ढोणे यांनी केली.

नगर :नाट्यगृहाच्या बंद पडलेल्या कामाची पाहणी करताना उपमहापौर मालन ढोणे. समवेत महेंद्र गंधे, मनोज दुलम, सोनाबाई शिंदे, उदय कराळे, सतीष शिंदे, सुरेश इथापे, अर्जुन जाधव, अशोक रकटे, संजय ढोणे, अभिजित ढोणे, रसिक कोठारी, मनोज पारखे, मनोज जाधव आदी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.