पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार (दि.15 ऑगस्ट) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय, मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला बाजार, पान बाजार, गुरांचा बाजार, केळी बाजार, गुळ-भुसार बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र, पेट्रोलपंप विभाग याखेरीज मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी उपबाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.