लसीकरणासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व देशांना ‘खास’ सूचना

लंडन – जगभरातील प्रत्येक देशात सप्टेंबरपर्यंत किमान 10 टक्के नागरिकांचे लसीकरण व्हायला हवे, अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

त्यापार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रायसिस यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. करोनाच्या साथीला रोखण्यासाठी आणि जागतिक अर्थकारणाला पुन्हा चालना देण्यासाठी लसीकरण हाच योग्य पर्याय असल्याचे डॉ. घेब्रायसिस यांनी सांगितले.

“जगभर लसींच्या उपलब्धतेमध्ये खूप अनियमितता आहे. काही देशांना खूप जास्त लस उपलब्ध झाली आहे. तर इतर अनेक देशांना आरोग्य कर्मचाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि अन्य गरजूंना देण्यासाठीही लस मिळालेली नाही.

जर एखाद्या देशाला लस मिळालेली लसेल तर तो इतर सर्व देशांसाठीही धोका आहे. त्यासाठी प्रत्येक देशाच्या किमान 10 टक्के नागरिकांना सप्टेंबरपर्यंत, या वर्षाच्या अखेरपर्यंत 40 टक्के आणि पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत 70 टक्के नागरिकांना लसीकरण व्हायला हवे, असे डॉ. घेब्रायसिस म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.