मोठी बातमी : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व दुकाने बंद – अजित पवार

पुणे – अनंत चतुर्दशीला (रविवार) पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट दिवसभर सुरु राहतील, तसेच औषधांची दुकाने आणि रूग्णालये सुरु राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील करोना आढावा बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. मात्र गणपतीच्या मंदीराबाहेरून दर्शनासाठी नागरिक शहरात गर्दी करत आहेत. करोनाचे संकट अजूनही टळलेले नसून खबरदारीचा उपाय म्हणून अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला.

‘पुणे आणि महाराष्ट्र पातळीवर साडेसहा महिने दोन्ही कोरोना लाट टिकल्या होत्या. त्याचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेसंदर्भात तयारी सुरु आहे. पुण्यातला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर कमी झाला आहे. मात्र जिल्ह्याचा रेट 0.07 आहे. हा वाढीचा दर असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.