पालघर : दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी राज्यामध्ये विविध संस्था कार्य करत आहेत. या संस्थांना पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.
नूतन गुलगुले फाऊंडेशन संचलित दिव्यांगासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वानंद सेवा सदन या इमारतीचे भूमिपूजन अर्नाळा येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
ज्या दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी पालक उचलू शकत नाहीत अशा बालकांसाठी स्वयंसेवी संस्था या कार्य करत असतात या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचे पालन पोषण तर होतेच तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वयंसेवी संस्था उचलत असते. आशा स्वयंसेवी संस्थांना समाजातील दानवीरांनी तसेच समाजातील प्रत्येक घटकाने आर्थिक मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले
नूतन गुळगुळे फाउंडेशन गेल्या पंचवीस वर्षापासून दिव्यांग व्यक्तींचा विकासासाठी कार्य करत आहे आता ही संस्था स्वानंद सेवा सदन या इमारतीच्या रूपाने दिव्यांगाच्या पाठीशी भक्कमपणे उभा टाकेल असा विश्वासही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.