शाळा सुरू करताच अनेक विद्यार्थ्यांना करोनाची लागण; हरियाणा सरकारनं घेतला मोठा निर्णय

चंडीगढ – हरियाणात शाळा सुरू झाल्यानंतर 150 हून अधिक विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे धास्तावलेल्या हरियाणा सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर हरियाणा सरकारने 16 नोव्हेंबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली.

त्यानंतर 3 जिल्ह्यांमधील 150 हून अधिक विद्यार्थ्यांना करोनाबाधा झाली. त्यामुळे संबंधित शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा चालू महिन्याच्या अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश सरकारकडून जारी करण्यात आला.

शिक्षकांनाही संबंधित कालावधीपर्यंत सुटी देण्यात आली आहे. त्या कालावधीत सर्व शाळांमध्ये निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. चालू महिन्यात हरियाणातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्या राज्यातील बाधित संख्येने याआधीच 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.