कोल्हापुरकडे जाणारे सर्वच मार्ग आजही बंद

पंचगंगेची धोका पातळी अजूनही 8 फूटांपर्यंत कायम

कोल्हापुर : सांगली आणि कोल्हापुरच्या पुराची दाहकता अद्यापही कायम आहे. पावसाने उसंत घेतली असली तरी पंचगंगेच्या धोक्‍याची पातळी 8 फुटांच्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री 1 वाजता पंचगंगेची पातळी 51.2 इंच एवढीच कमी झाली होती. कोल्हापुर जिल्ह्यात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच अजूनही एनडीआरएफचे जवान नागरिकांचे मदत करत आहेत. दरम्यान, कोल्हापूरकडे जाणारे सर्वच मार्ग आजही बंदच असल्याचे दिसत आहे.

कोल्हापुरच्या पंचगंगेची पाणी पातळी कमी होत असली तरी अनेक पुलावर आणि रस्त्यावर पाणी असल्याने कोल्हापुरकडे जाणारे सर्वच मार्ग आजही बंदच आहेत. मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर अद्यापही चार फूटापर्यंत पाणी असल्याने हादेखील मार्ग बंद आहे. सिंधुदुर्गातून गगनबाडामार्गे कोल्हापूरात येण्याच्या रस्त्यावरही पाणी आहे तसेच सांगलीतून कोल्हापुरात येणाऱ्या रस्त्यावर पाणी किंचीतही कमी न झाल्याने या दिशेकडीलही मार्ग बंदच आहेत. त्यामुळे कोल्हापुरला जाणारे सर्वच मार्ग पाण्यामुळे आजही बंदच असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.