पुणे – नवी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेली मारहाणीची घटना आणि सुधारित नागरी कायद्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने सोमवारी (दि.23) पुण्यातील सर्व महाविद्यालय बंदची हाक दिली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या “एनआरसी’ व “सीएए’ कायद्याच्या निषेधार्थ व समर्थनार्थ या दोन्ही बाजूंनी विद्यार्थी संघटनांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा काढला. विद्यापीठात झालेल्या या कायद्याच्या निषेधार्थ रॅलीत खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनानंतर आता राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने सोमवारी सर्व महाविद्यालय बंदची हाक दिली आहे.
या निषेधाची सभा सोमवारी फर्गसन महाविद्यालय येथे दुपारी 2 वाजता होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल मोरे आणि सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी दिली. संघटनेने याबाबतचे फलक शहरातील मुख्य महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावले आहे.