बर्लिन – जर्मनीतील सर्वात मानाची समजली जाणाऱ्या बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धेतील एका संघातील सर्व खेळाडूंना करोनाची लागण झाल्याच्या संशयाने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंची पुढील तीन दिवसांत सातत्याने चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
ही स्पर्धा सुरू व्हावी यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मार्केल यांनी पुढील आठवड्यात सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्याचवेळी डायनोमो क्लबमधील दोन खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आल्यानंतर या दोन्ही खेळाडूंसह सर्व संघालाच विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही स्पर्धा सुरू होणार का असा प्रश्न निर्माण झाला असून या क्लबचे साखळी फेरीतील सुरुवातीचे सामने रद्द करण्यात आले आहे.