ताजमहालसह सर्व स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद

ऐतिहासिक वास्तू, पुरातत्त्व स्थळे आणि संग्रहालयेही बंद

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशासह अनेक राज्यांत कोरोनाचं हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालाय. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ताजमहाल, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ताजमहालसह सर्व स्मारके पुन्हा एकदा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलीत. गुरुवारी संध्याकाळी पुरातत्त्व खात्याने हा आदेश काढला. त्याअंतर्गत ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्रीसह देशभरातील सर्व स्मारके 15 मेपर्यंत बंद राहणार आहेत. 2020 मध्ये ताजमहाल कोरोनामुळे 188 दिवसांसाठी बंद होता.

आग्र्यामधील ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सीकरी, एत्माद्दौला, सिकंदरा, महताब बाग यासह स्मारकांनाही टाळे ठोकण्यात आलेय. देशातील प्रमुख स्मारकांपैकी कुतुब मीनार, हुमायूंचा मकबरा, अजिंठा एलोराच्या लेण्यांसह 200हून अधिक ऐतिहासिक वास्तू, पुरातत्त्व स्थळे आणि संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

कोरोना विषाणूमुळे ताजमहाल दुसऱ्यांदा बंद झाला. 2020 मध्ये ताजमहालसह आग्र्यामधील सर्व स्मारके 17 मार्च ते 21 सप्टेंबरदरम्यान बंद ठेवण्यात आलीत. आग्रामध्ये पहिल्यांदाच ताजमहालसह सर्व संरक्षित स्मारके इतके दिवस बंद राहिले होते. कोरोनाची दुसरी लाट पाहून स्मारके पुन्हा एकदा बंद करण्याचा आदेश काढण्यात आलाय. अशा परिस्थितीत आग्राच्या पर्यटन उद्योगाशी संबंधित चार लाख लोकांनी पुन्हा रोजीरोटीची चिंता सतावते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.