‘आयफा’साठी जमवलेली सर्व रक्क्म ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी – शिवराजसिंह चौहान

नवी दिल्ली – चीनसह जगभरात हैदोस घालणाऱ्या करोना विषाणूने भारतात सुद्धा अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे चित्रपटसृष्टीतील यंदाचा ‘आइफा पुरस्कार’ (International Indian Film Academy Awards) सोहळा पुढे ढकलण्यात आला. आयफा 2020 चं आयोजन यंदा इंदौरमध्ये 27-29 मार्च या कालावधीमध्ये करण्यात आलं होतं.

मात्र, आता आयफा इव्हेंटसाठी अलॉट करण्यात आलेले पैसे सीएम फंडमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. हे सर्व पैसे कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी वापरण्यात येणार आहे. अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ‘शिवराजसिंह चौहान’ यांच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली.

शिवराजसिंह म्हणाले, “मध्य प्रदेशात आयफाचं आयोजन होणार होतं. सध्या सुरू असणाऱ्या COVID-19 च्या संकटामुळं जर आयफावर खर्च होणारी रक्कम ही मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिली तर यामुळं जनतेल मोठी मदत होईल.”

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.