पुणे – एसएनबीपी अकादमी, नवल टाटा, नागपूर अकादमी, हर अकादमी, राजा करण अकादमी, सेल हॉकी संघांनी आपआपल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून 5 व्या एसएनबीपी अखिल भारतीय 16 वर्षाखालील मुलांची हॉकी स्पर्धेत बाद फेरीतील आपली जागा निश्चिचत केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने असलेल्या या स्पर्धेत जी गटाच्या सामन्यात प्रजापती कृष्ण कुमार, अरूण पाल, झैद मोहम्मद खान, रोहन सिंग यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर एसएनबीपी अकादमी संघाने कोलकाता वॉरियर्स संघाचा 5-0 गोलने पराभव करून बाद फरीत प्रवेश केला.
एफ गटामध्ये पश्चिम बंगालच्या बेलकुलाई सीकेएसी विद्यापींठ संघाने हॉकी नाशिक संघाला 5 -0 गोलने नमविले. विजयी संघाकडून गौरव संगेलेने 10 व्या व 20 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळून दिली. त्यांया गणेश चौधरीने 25 व्या, यादनेश पगारेने 51 व्या व निनाद गाडेने 54 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला. हॉकी नाशिक संघाचे खेळाडू एकही गोल करू शकले नाही.
सोनीपतच्या हर हॉकी अकादमीने ए गटात मालवा हॉकी अकादमीला 12 -0 गोलने पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला. हर अकादमीकडून साहिल रौल 2 गोल (6 व 48 मि.), मन्नू मलिक 1 गोल (4 मि.), सुखविंदर 3 गोल (36, 43, 37 मि.), नितीन 1 गोल (39 मि.), विनय 2 गोल (42 व 60 मि.), नवीन 1 गोल (44 मि.), जीतपाल 1 गोल (45 मि.) व नितिन 1 गोल (55 मि.) यांनी आपल्या संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. मालवा हॉकी अकादमीकडून एकही गोल नोंदविला गेला नाही.
सी गटात झालेल्या चुरशीच्या लढतीत अमरजीत सिंगने 5 व्या मिनिटाला नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर नागपूर हॉकी अकादमी संघाने अमृतसरच्या एसजीपीसी संघाला 1-0 गोलने पराभव करून बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली. एच गटात कर्नालच्या राजा करण अकादमी संघाने उत्तर प्रदेशच्या अनवर हॉकी सोसायटी संघाचा 2-1 गोलने तर सेल हॉकी अकादमीने भिलवाडा हॉकी अकादमीचा 3-0 गोलने पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.