ढाका – जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी त्या देशातील हिंदू समुदायाच्या नेत्यांशी संवाद साधला. बांगलादेशातील प्रत्येक नागरीकाला तो कोणत्याही धर्माचा असला तरी समान अधिकार मिळतील त्यामुळे तुम्ही स्वताला अल्पसंख्याक मानू नका, या देशात नागरीक म्हणून मला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार सर्व िेंहंदुंनाहीं आहेत असे नमूद करीत पंतप्रधानांनी तेथील हिंदु समाजामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्या म्हणाल्या की, सर्व धर्माच्या लोकांनी समान हक्काने जगावे अशी आमची इच्छा आहे. ढाका येथील ढाकेश्वरी मंदिर आणि चट्टोग्राममधील जेएम सेन हॉल येथे झालेल्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमात पंतप्रधान सामिल झाल्या होत्या. दुर्गा पूजा उत्सवादरम्यानही हिंदु समाजाला पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी सरकारच्यावतीने दिले. त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगाल किंवा कोलकाता पेक्षा आमच्या देशात आणि ढाक्यात दुर्गा पुजेचे अधिक मंडप असतात.
जेव्हा जेव्हा एखादी अप्रिय घटना घडते तेव्हा बांगलादेशात हिंदू समाजाला कोणतेही अधिकार नाहीत, अशा पद्धतीने प्रचार केला जातो, अशी खंत हसिना यांनी व्यक्त केली.हसीना म्हणाल्या की, आमच सरकार आणि अवामी लीग कोणत्याही धर्मातील लोकांना कमी करण्यावर विश्वास ठेवत नाही. या बाबतीत आमचे सरकार अत्यंत दक्ष आहे असेही त्यांनी नमूद केले. 2022 च्या जनगणनेनुसार हिंदू समुदाय बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धार्मिक समुदाय आहे,तेथे एकूण लोकसंख्येपैकी 7.9 टक्के लोकसंख्या हिंदुंची आहे.