नगर – नेवासा तालुक्यात भानसहिवरा शिवारात रस्ता लुट करणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अक्षय रजनिकांत मकासरे, (वय-23, रा.भानसहिवरा ता.नेवासा), तुषार बाबासाहेब निपुंगे, सागर एकनाथ वंजारे, राहूल मच्छिद्र साळवे (सर्व रा.भानसहिवरा ता.नेवासा जि.अ.नगर) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, भानसहिवरा परिसरात बचत गटाची रक्कम बॅंकेत भरण्यासाठी चाललेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून 2 लाख 785 रुपये मकासरे याने व त्याच्या साथीदाराने लुटले असल्याची खात्रीशिर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली.
मात्र हा आरोपी साखरवाडी. (ता.फलटण जि.सातारा) येथे ऊसतोडी कामावर आहे. त्यानुसार रविंद्र कर्डीले, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, संतोष लोढे, राहुल सोळंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, दिपक शिंदे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले.