लंडन – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने मानाच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्घेतून बाहेर पडली आहे. तिला महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नाओमी ओकूहाराकडून 12-21, 21-15 व 21-13 असा पराभवाचा सामना करावा लागला.
ओकूहाराने आजवर सिंधूविरुद्ध झालेल्या 16 लढतींमध्ये 9 वेळा विजयाची नोंद केली आहे तर सिंधूने 7 वेळा विजय मिळविला होता. शुक्रवारी झालेल्या लढतीत मात्र सिंधूकडून टाळता येणाऱ्या अनेक चुका झाल्या व तिला सामना गमवावा लागला.
या सामन्यापूर्वी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने कोरियाच्या सुंग जी युनवर केवळ 49 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-19, 21-15 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.