लंडन – मलेशियाच्या ली जी जियाने अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या गतविजेत्या व्हिक्टर ऍपक्सलसेनचा पराभव करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. एक तास 14 मिनिटे चाललेल्या या सामन्यात ली जीने ऍलक्सलसेनला 30-29, 20-22, 21-19 असा पराभव केला.
या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ली जी जियाने ऑक्सलसेनला मात दिली. त्यानंतर पुढच्या सेटमध्ये अेॅक्सलसेनने दमदार पुनरागमन केले. निर्णायक सेटमध्ये ली जी जियाने आघाडी मिळवत सामना आणि किताब नावावर केला.