नवी दिल्ली – करोना झालेल्यांचे मृत्यू त्यांना असणाऱ्या सहव्याधींचा विचार न करता करोना मृत्यू म्हणून गणण्यात येतील, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायलयात दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, कोणत्याही सहव्याधी असणाऱ्या व्यक्तीला करोना झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याची नोंद करोना मृत्यू या वर्गवारीत करण्यात येईल. त्यात केवळ करोनामुळे मृत्यू झाला नाही, असे ठोसपणे म्हणता येईल अशा घटनांचा अपवाद करण्यात येईल. (उदा. अपघाती मृत्यू, विषबाधा आदी)
संसदीय कायद्याप्रमाणे बनवलेल्या अथवा बंधनकारक आचारसंहितेप्रमाणे निर्माण केलेल्या यंत्रणेद्वारे दाखल झालेली करोना मृत्यूंची यादी सादर करण्यात आली. सोबत जोडलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की करोना पॉझिटिव्ह व्यक्तींचे मृत्यू करोना मृत्यू वर्गवारीत नोंदण्याचे त्यात स्पष्ट केलेआहे. ही आचारसंहिता आयसीएमआरने बनवली आहे. ती जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार बनवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.