एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: एसटी प्रवर्गाच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागून होणार आहे. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी समाजाच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

धनगर समाजाने आपल्या आंदोलनामध्ये शासनाकडे आरक्षणाची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना आश्वासन दिले होते. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक पार पडली परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र लागू केले नाही तर उरलेल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे सकल धनगर समाजाची चिंतन बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.