बर्लिन – जर्मनीतील प्रसिद्ध बुंडेसलीगा फुटबॉल स्पर्धा नुकतीच सुरू झाल्याने अन्य स्पर्धांबाबत देखील अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात संपूर्ण युरोपमधील सर्वच्या सर्व मानाच्या स्पर्धा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड यांच्यासह युरोपातील अनेक देशांमध्ये करोनाचा खूप मोठा फटका बसला होता. त्यामुळे दरवर्षी होत असलेल्या सर्व मानाच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. बुंदेसलीगा स्पर्धेचा अखेरचा टप्पा स्थगित झाला होता तो सुरू झाल्याने या सर्व स्पर्धांना नवसंजीवनी मिळाली आहे.